सज्जनांचे रक्षण व दुर्जनांचे निर्दालन हे ब्रीद वाक्य डोळ्यासमोर ठेवूनच काम करणार – सपोनि शशिकांत शेळके
पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस पोलिस स्टेशन अंकित पिलीव औट पोस्टचे पोलिस उपनिरीक्षक आदिनाथ महानवर यांच्या तडखा-फडकी बदली नंतर पिलीव औट पोस्टचा पदभार माळशिरस पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शशिकांत शेळके यांनी स्विकारला आहे.पिलीव परिसरातील अवैद्य धंदे बंद करणे,गावगुंडाच्या मुसक्या आवळने,रोड रोमिओंचा पाठलाग करुन कारवाई करणे व सज्जनांचे रक्षण करुन दुर्जनांचे निर्दालन करणे हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून मी निस्वार्थीपणे काम करणार असल्याचे शेळके यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सदर प्रसंगी पिलीव पत्रकार संघाच्या वतीने शेळके यांचा शाल,श्रीफळ व पुष्पहार देवून यथोचित सन्मान करण्यात आला.यावेळी पिलीव पत्रकार संघाचे अध्यक्ष सुजित सातपुते,जेष्ठ पत्रकार दामोदर लोखंडे,प्रा.संजय पाटील,प्रमोद भैस,शाहरुख मुलाणी,अभिजीत तावरे व सुरज काटकर उपस्थित होते.
