अंगणवाडी सेविकांना एकशे तेहत्तीस कोटी बावीस लाख रुपये मंजूर लोकप्रिय नेते वैभवजी गिते साहेबांच्या पाठपुराव्याला यश…!

महिला व बालविकास विभागाच्या दिनांक 5 नोव्हेंबर 2020 च्या शासननिर्णयाद्वारे मान्यता

पिलीव/प्रतिनिधी
कोरोना कोविड 19 या विषाणूच्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आंगणवाडी सेविका/मदतनीस/मिनी अंगणवाडी सेविका यांचे मानधन अदा करण्यासाठी निधी वितरित केला नसल्यामुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली होती. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य सचिव वैभव तानाजी गिते यांच्याकडे शासनाकडून निधी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करावा अशी विनंती केली होती.आंगणवाडीत शिकणारी मुले ही गरीब व बहुजन वर्गातील असतात शिवाय त्यांच्यासाठी कार्यरत असलेल्या सेविकांना,मदतनीसांना खूपच तुटपुंज्या मानधनावर नाईलाजाने काम करावे लागते ही गंभीर बाब लक्षात घेऊन
लोकप्रिय नेते वैभवजी गिते यांनी नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य महासचिव ऍड.डॉ.केवलजी उके,राज्य समन्वयक रमाताई अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते विकास दादा धाइंजे यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा केला.अखेर महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने दिनांक 5 नोव्हेंबर 2020 रोजी च्या शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका यांचे मानधन अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला 13322.00 लक्ष (एकशे तेत्तीस कोटी बावीस लाख रुपये इतका निधी वितरीत करण्याबाबत मान्यता दिली आहे


सदरच्या शासन निर्णयात आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना,नवी मुंबई यांच्या अधिनस्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते. केंद्र शासनाकडून विहित कालावधी निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन आधार करणे शक्य व्हावे, याकरिता अपर मुख्य सचिव (वित्त)यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 2 जून 2017 रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य प्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागात अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
त्याआधारे हा शासननिर्णय काढण्यात आला आहे.त्यामुळे अंगणवाडी सेविकांना मानधन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.लोकप्रिय नेते वैभव गिते यांनी शासनाचे आभार मानले आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *