पिलीव येथे कोरोनाविरूध्द निस्वार्थीपणे कर्तव्य बजावणारा स्वयंसेवक तानाजी लोखंडे..!

पिलीव/सुजित सातपुते
मार्च 2020 पासुन कोरोना साथीच्या व लाॅकडाऊन कालावधीमध्ये ग्रामदक्षता समितीने नेमणुक केल्यापासुन कर्तव्यावर असलेले माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील समाजसेवक तानाजीभाऊ लोखंडे हे खरोखरच रात्रंदिवस कोरोना हटावचा मंत्र घेऊन ग्रामपंचायत,प्रा.आ.केंद्र,तलाठी,पोलीस खाते या सर्व पदाधिकारी,अधिकारी व्यापारी या सर्वांचा समन्वय साधुन प्रामाणिकपणे व निरपेक्ष वृत्तीने काम करीत आहेत.लाॅकडाऊन व नियमांचे पालन करुन प्रसंगी काॅरंटाईनच्या बाबतीत कठोरपणे प्रसंगी आप्तैष्ट, मित्रमंडळी याचे नातेगोत्यांचाही विचार न करता कायद्याच्या चौकटीत राहुन काम करीत असुन कोरोनाविरूध्द लढा देवून सेवा करीत ग्रामस्थांना दिलासा देत असल्याचे दिसत आहे.या त्यांच्या सेवेबद्दल पिलीव व परिसरात त्यांचे कौतुक होत असून खरोखरच तानाजी लोखंडे यांना कोव्हीड 19 योध्दा पुरस्काराने गौरविने गरजेचे असल्याचे जनतेतून बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *