सदगुरु श्री श्री मार्फत गोरगरीब व गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप..!


पिलीव/प्रतिनिधी:
भारतात नव्हे तर जगात कोणाच्या साथीने रोजगाराच्या वाटा बंदझाले आहेत लोक डाऊन असल्याने अनेक कुटुंबांना उपाशीपोटी राहावे लागत असल्याने सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून आपणही समाजसेवेचे कंकण हाती घेतले पाहिजे या विचाराने सद्गुरु श्री श्री साका श्रीनगर राजेवाडी कारखान्याचे चेअरमन एन शेषागिरी राव व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील व सर्व संचालक मंडळाच्या विचाराने सद्गुरु श्री श्री कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील यांच्या हस्ते आटपाडी तहसील चे तहसीलदार सचिन लंगोटे यांच्याकडे गोरगरीब गरजू निराधार व ज्यांना रेशन कार्ड नाही व खरोखरच ज्या लोकांना आवश्यकता आहे अशा गरजवंतांना गहू ,तांदूळ, गोड तेल, तिखट हळद, मीठ, साखर, चहा, साबण अशा जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे दिघंची लिंगीवरे राजेवाडी या ठिकाणी किट वाटप करण्यात आले यावेळी राजेवाडी ग्रामपंचायत चे मार्गदर्शक पांडुरंग कोडलकर एडमिन मॅनेजर समीर सय्यद सचिन खटके कर्मचारी गजानन सांगण नितीन लोंढे उपस्थित होते. या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांमधून कौतुक केले जात आहे सद्गुरू श्री श्री सा का तर्फे सोलापूर जिल्ह्यातील ही उन्हातान्हाची पर्वा न करता स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेची सेवा करणार्या पोलीस खात्यातील कर्मचाऱ्यांना मास्क व सैनी टायझर ची व्यवस्था केली असल्याचे समजते टायगर ची व्यवस्था केली असल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *