प्रा.विजय काकडे यांच्या”माझा शाळा प्रवेश दिन”या ग्रंथास उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार प्रदान..!
पिलीव/सुजित सातपुते
ॲग्रोन्युज परिवार व लायन्स क्लब फलटण यांच्यावतीने आयोजित तिसऱ्या छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनात बारामती येथील नामांकित प्राध्यापक विजय काकडे यांच्या “माझा शाळा प्रवेश दिन”या ग्रंथास उत्कृष्ट कथासंग्रह हा पुरस्कार देउन गौरवण्यात आले आहे.संमेलनाचे प्रमुख अतिथी साहित्य सांस्कृतिक मंडळाचे सदस्य व जेष्ठ साहित्यिक मा.जगन्नाथ शिंदे, समेलनाध्यक्ष मा.विलास वरे व कार्याध्यक्ष पत्रकार मा.प्रकाश सस्ते यांच्या हस्ते मी हा पुरस्कार माझे वडील बंधू राजेंद्र काकडे,सौ.वहिनी,पुतण्या या कुटुंबियांसोबत स्वीकारला असल्याचे प्रा.विजय काकडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.सदरचा पुरस्कार मिळाल्याने प्रा.काकडे यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असल्याचे पहावयास मिळत आहे.