न्यायालयाच्या अवारातील चंदनाचे झाड चोरी करणाऱ्या टोळी सह अन्य एक अटल दरोडेखोर टोळी माळशिरस पोलिसांच्या जाळ्यात…!
पिलीव / सुजित सातपुते
माळशिरस पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून घरफोडी,चोरीच्या व लुटमारीच्या वारंवार घटना घडत असल्याने माळशिरस पोलिसांनी कोंम्बींग ऑपरेशन व पेट्रोलिंग नेमून विशेष लक्ष दिले होते.त्याच अनुषंगाने पोलिस अधिकारी व कर्मचारी रात्रीच्यावेळी गस्त करत असताना खबर्या मार्फत बातमी मिळाली की माळशिरस पिलीव रोडवर RTO अकलूज यांच्या चालक प्रशिक्षण कार्यालयाजवळ झुडपांमध्ये काही इसम दबा धरुन बसले आहेत.तेव्हा सदर ठिकाणी छापा टाकला असता आरोपी किरण राजा काळे,वय 26 वर्ष,कोहिनूर दगडू काळे वय 20 वर्ष दोघे राहणार मोठेवाडी ता.माळशिरस हे ये-जा करणाऱ्या वाहनांवर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दबा धरून बसल्याचे हत्यारासह मिळून आले व त्यांच्या इतर तीन साथीदारांनी तेथून पलायन केले.सदर गुन्ह्याचे तपास अधिकारी सपोनि शशिकांत शेळके यांनी अटक करून त्यांच्याकडे अधिक तपास केल्यानंतर त्यांनी माळशिरस पोलिस ठाणे हद्दीत दोन घरफोडी व एक चोरी केल्याचे कबूल केले.त्यांच्याकडून सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल व कोर्ट परिसरातील चोरीस गेलेल्या चंदनाच्या झाडाचे लाकुड हस्तगत केले आहे.

त्यानंतर माळशिरस पोलीस ठाणे गु.र.नं 22 / 2020 भादवि कलम 457,380 या गुन्ह्याच्या तपासकामी गोपनीय खबर्या मार्फत बातमी मिळाली की सदर गुन्हा राजू मधुकर पवार वय 20 वर्ष,कृष्णा गोदूराम काळे,वय 22 वर्षे यांनी केला असून ते सध्या भंडीशेगाव ता.पंढरपूर येथे भाड्याने राहत आहेत.अशी माहिती मिळताच सदर ठिकाणी पोसई आदिनाथ महानवर,विक्रम घाडगे,सचिन हेंबाडे,दत्तात्रय खरात,माने,शेंडगे यांचे पथक पाठविले असता सदर आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न करून पथकाच्या अंगावर स्विफ्ट कार घालण्याचा प्रयत्न केल्याने पथकातील कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली होती.त्यामुळे पंढरपूर पोलिसांत खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर आरोपींनी माळशिरस शहरातील चार ठिकाणी व खुडूस येथे एका ठिकाणी घरफोडी केली असल्याची कबुली तपास अधिकारी सपोनि शशिकांत शेळके यांना दिली.तसेच त्यांच्याकडे अधिक तपास करून 14 वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल,सोन्या-चांदीचे दागिने,रोख रक्कम,दोन एलसीडी टीव्ही असा एकूण अंदाजे 10 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.तसेच सदर आरोपींनी हडपसर व लोणीकंद हद्दीत घरफोडी व चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे,अकलुजचे उपविभागीय पोलिस अधिकारी निरज राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विश्वंभर गोल्डे,सपोनि शशिकांत शेळके,पोसई आदिनाथ महानवर,विक्रम घाडगे,समीर पठाण,अभिजित कुंभार,अमोल बकाल,सचिन हेंबाडे,दत्तात्रय खरात,सुभाष पावरा,राहुल रुपनवर,सुशील साळुंखे,प्रणय शिंदे,राहुल झुंझुर्डे,समाधान शेंडगे,सोमनाथ माने,तुळशीराम गायकवाड,रमेश बोराटे व सुनिता केंगले यांनी केली.