‘राज कलेक्शन’तर्फे भव्य लकी ड्रॉ व भरघोस बक्षिसांचा खजिना,प्रत्येक खरेदीवर 50% सूट ; थार, क्विड आणि अल्टोसह 7777 आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी !

पिलीव/सुजित सातपुते

आनंद, उत्साह आणि प्रकाशसंवर्धानाचा सण असलेल्या दिपावलीमध्ये नवीन कपडे परिधान करण्याची आपल्या संस्कृतीत जुनी परंपरा आहे. दिपावली हा सण नवीन सुरुवातीचे, समृद्धीचे आणि मांगल्याचे प्रतीक मानला जातो. या पवित्र सणात प्रत्येकाच्या घरी नवीन वस्त्रे आल्याशिवाय दिपावलीचा आनंद पूर्ण होत नाही. जुन्या गोष्टी मागे टाकत नव्या उमेदीने जगण्याची प्रेरणा नवीन वस्त्रे देतात. याच दिपावलीच्या सणाला अधिक आनंदी आणि उत्सवी बनवण्यासाठी पिलीव येथील मुख्य पेठेत , आंधळकर चौक येथे नव्याने सुरू झालेले भव्य वस्त्रदालन ‘राज कलेक्शन’ ग्राहकांसाठी एक अत्यंत आकर्षक आणि भरघोस योजना घेऊन आले आहे.
7777 बक्षिसांचा महा-खजिना आणि लकी ड्रॉचे आकर्षण
पिलीवसह परिसरातील ग्राहकांसाठी ‘राज कलेक्शन’ने विशेष दीपावली फेस्टिव्हल अंतर्गत 7777 बक्षिसांचा भरघोस खजिना जाहीर केला आहे. या वस्त्रदालनातून 5000 रुपयांची खरेदी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला लकी ड्रॉचे एक मोफत कुपन दिले जाणार आहे. हा लकी ड्रॉ अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पडणार असून, यामध्ये विजेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव होणार आहे.
मुख्य बक्षिसे खालीलप्रमाणे आहेत:

  • पहिले बक्षीस: आकर्षक थार गाडी (Thar)
  • दुसरे बक्षीस: रेनॉल्ड कंपनीची क्विड चार चाकी गाडी (Renault Kwid)
  • तिसरे बक्षीस: मारुतीची अल्टो चार चाकी गाडी (Maruti Alto K10)
  • चौथे बक्षीस: रुबाबदार बुलेट गाडी (Bullet)
  • इतर बक्षिसे: याशिवाय इलेक्ट्रिक स्कूटर, स्मार्ट टीव्ही, फ्रिज, वाशिंग मशीन, सोन्याचे दागिने, सायकल, डिनर सेट यांसारख्या तब्बल 7777 बक्षिसांचा लाभ भाग्यवान विजेत्यांना घेता येणार आहे.
    प्रत्येक खरेदीवर सरसकट ५०% सूट
    ‘थेट मिल ते ग्राहक’ या संकल्पनेवर आधारित असलेल्या ‘राज कलेक्शन’मध्ये सुटिंग-शर्टिंग, जेंट्स वेअर, साडी-शालू, चिल्ड्रेन वेअर, लेडीज वेअर आणि होजिरीचा दर्जेदार व फॅशनेबल साठा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक खरेदीवर ग्राहकांना ५०% ची घसघसीत सूट दिली जात आहे.
    पिलीव व परिसरातील सर्व प्रिय ग्राहक बंधू-भगिनींनी या लकी ड्रॉ चा व 50% सवलतीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, आपल्या कुटुंबासह ‘राज कलेक्शन’ला भेट देऊन प्रत्येक खरेदीवर 50% सूट मिळवावी आणि 5000 रुपयांच्या खरेदीवरील लकी ड्रॉ कुपन प्राप्त करून थार गाडीसह इतर बहुमूल्य बक्षिसांचे मानकरी व्हावे, असे विनंती वजा आवाहन वस्त्रदालनाचे ओनर समीर (शेठ) सय्यद व मोहसीन (राज) सय्यद यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *